Wednesday, 6 May 2015

उन्हाळी सुट्टीतील प्रकल्प उपक्रम

उन्हाळी सुट्टीतील प्रकल्प उपक्रम

जिज्ञासा ट्रस्ट ठाणे या स्वंस्थेने उन्हाळी सुट्टीतला उपक्रम म्हणून शालेय गट इ. ६वी ते ९वी , कनिष्ठ महाविद्यालय इ. ११वी, १२वी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संशोधन प्रकल्प सादर करण्याची योजना आखली आहे. विद्यार्थ्यांनी एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने प्रकल्प मांडणी करणे हे या उपक्रमात अपेक्षित आहे. आर्थिक, सामाजिक आणि वैज्ञानिक विषयातील कुठल्याही विषयावर एक ते तीन हजार शब्दापर्यंत हा प्रकल्प मराठी अथवा इंग्रजी भाषेत  सादर करता येईल. या प्रकल्प अभ्यासाचा उपयोग विद्यार्थांना त्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात होईलच त्याबरोबर समाजाला पण याचा उपयोग होईल असा विश्वास सुरेंद्र दिघे यांनी व्यक्त केला आहे. गुणवत्तापूर्ण प्रकल्प एकत्रित संकलित करून ते प्रसिध्द करण्यात येतील.
दोन ते पाच विद्यार्थ्यांचा गट या उपक्रमात विनामुल्य सहभागी होऊ शकतील. सहभागी गट विषय स्वत: निवडू शकतील अथवा गरज असल्यास विषय जिज्ञासा ट्रस्ट सुचवू शकेल. निवडलेल्या गटांना खर्चासाठी जिज्ञासा ट्रस्टच्यावतीने प्रत्येकी पाचशे रुपयाची शिष्यवृत्ती देण्यात येईल. त्याबरोबर मार्गदर्शनासाठी तज्ज्ञ व्यक्ती उपलब्ध करून देण्यात येईल. उत्कृष्ट प्रकल्पांना रोख बक्षीसे देण्यात येतील. प्रकल्प नोंदीसाठी प्रकल्पाचा आराखडा शंभर ते दोनशे शब्दात १० मे पर्यंत जिज्ञासा संस्थेत सादर करणे आवश्यक आहे. प्रकल्प सादर करण्याची अंतिम मुदत ३० जून २०१५ आहे.

अधिक माहितीसाठी – जिज्ञासा ट्रस्ट २५४०३८५७

No comments:

Post a Comment